Saturday, February 6, 2010

kavita vidanban

 आम्ही  कोण?  म्हणुनी  काय  पुसता
 आम्ही  असू  समाजाचे  सच्चे  पाईक
बघितले  नव्हेत  कां  फोटो आमुचे ?
 जे  समाज्पात्रिकेत  दिसे कर्तृत्वाने  झळकत
समाजसुधारणेचे  पवित्र  कार्य  हे
आन्गिकारुनी  बनलो  आम्ही पदवीधारक
ह्यात  स्वार्थ  आमुचा किती  म्हणुनी पुसता
तुम्ही  कोण हो ? आम्ही आसू  सदस्वर्थार्थ
हा समाज  उभा आहे आमुच्याने
हेच काय कमी मानता नि;स्वार्थ
भले मग समाजाच्या पांघरुणाखाली
कोणतेही स्वकार्य पाडू आम्ही पार
नाव परी त्याजला देवू समाजकार्य थोर
आसे आम्ही असू थोर समाजसेवक
काय पुसता आम्हास ?आम्ही जातीचे पाईक

divaswapn

वाटे मजला  सदैवं मनोमन
करुनिया हृदयवेलीवर प्रेमसिंचन
एक फुल उदयी यावे चिन्मय
जसे मडके घडी  चाक  मातीतून
घाट जगावेगळा साजिरा साकारीन
ऐसेची सर्वांग व्यक्तित्व घडवीन
कीर्ती जयाचीप्रसारी  चहुबाजूनी
त्याची  माता सर्वत्र  म्हणवूनी
करी साधना श्रेष्ठ जगती  या
रविकिरण  पावन होवोनी उधळ्या
सखासंग  करी  मज  साथ द्यावया
एऐसेची  मनी  वसतसे   मम चिंतन
जरी  ठरले  आजुनी तरी  दिवा स्वप्ना
  साधना  पाटील          








करुनिया हृदयावेलीवर प्रेमसिंचन
एक फुल उदयी यावे चिन्मय
जसे मडके घडीचाक  मातीतून
घाट जगावेगळा  साजिरा साकारीन  

Monday, February 1, 2010

Manasvi man

मनस्वी मन
भावनाशुन्य अशा ह्या जगात
मनस्वी मानव भरडला जात आहे
दरेक पावलागणिक रस्त्यात
आत्माविस्वासी मन ठेचकाळत आहे
कोण कोणाचा ?म्हणुनी पुसत
नात्यांचा गुंतवला सोडवत जात आहे
माणुसकी नसलेल्या माणसात
भावनांचा प्रतिसाद शोधात जात आहे
नाही थारा भावनांना समाजात
हेच रडगाणे गात चालतच आहे
कोणी समजवावे वेड्या मनास
हे जगच विनाधारे चालत जात आहे
तरी आपुल्या भाबड्या मनात
आशेची ज्योत ज्वलंत राखून जात आहे
-Sadhana

manache khel

                मनाचे  खेळ
 वाटे  मला  सदैव  घ्यावी  भरारी  उंच  गगनात
 स्वैरविहार  करुनी  न्याहालित  जग
 पक्षिजीवन  निस्वार्थपने  भोगावे
 वाटे मला  सदैव
    बगदावे  बागेत फुलाफुलातुन
 फुलपखारागत  व्हावे धुंध
 बहरलेल्या  रंगबिरंगी  फुलाच्या  सुगंधात
 जगावेगाले निष्पाप जीवन  जगावे
वाटे मला सदैव
 खलखल करुनी  वहावे  सरितेसम
 बनुनी  अल्लड   षोडशी गुणगुणत गाने
 झुंज देत  धावु नी   कराकापर्यातुनी
प्रेम भावरुपी  सागराशी लीन  व्हावे
 वाटे मला  सदैव
  लहान  बालकच   सदा  रहावे
हंसरे निष्पाप  जीवन  प्रेमाने जगावे
निरखाताना  नविन  जगाला
 आपुलकीच्या  ह्यास्यात   सर्वाना  जिंकुन घ्यावे
वाटे मला सदैव
व्हावे  उभ्या  जगाचे  कैवारी
 जादुगत  कांडी फिरुवुनी
 दू;ख  सर्यांचे  सुखात फिरवावे
राग द्वेष तिरस्कार  ही  सारी  किल्मिषे
फेकुनिया झटक्यात  सुखद प्रेमाचा
आनदाचा  प्रकाश  जगी   प्रसरावे





















 

















































 











Wednesday, July 1, 2009

निरंकुश माणूस

निरंकुश माणूस
भौतिक सुखाच्या ह्या गराड्यात
हरवलय माणसाच माणूसपण
धरुनिया सुखाची अतृप्त लालसा
बांधलय वेठीला स्वतःच स्वपण
असू जरी आम्ही हक्कासाठी अधाशी
नसे मात्र सोयरसुतकही कर्तव्याशी
दडपली सारी आधुनिकतेच्या आवरणात
आपल्याच चारित्र्याची सखोल संस्कृती
वरकरणी जरी दाखवत असू पुरोगामी
दिसुन येई नेहमीच प्रसंगी अधोगती
कशास जगलो, का जगलो कोणी बरे सांगावे
उठता बसता मात्र दोष नशिबाला द्यावे
तुडविली सारी बंधने आज माणसाने
म्हणून का फिरविली पाठ निसर्गाने?

Translation

निरंकुश माणूस
The Unbridled man
भौतिक सुखाच्या ह्या गराड्यात
In this great heap of worldly joys,
हरवलय माणसाच माणूसपण
man's humanity is lost
धरुनिया सुखाची अतृप्त लालसा
having the ever unquenched greed of these joys
बांधलय वेठीला स्वतःच स्वपण
one has even bet one's self-esteem
असू जरी आम्ही हक्कासाठी अधाशी
if we are greedy for our rights
नसे मात्र सोयरसुतकही कर्तव्याशी
but there is no consciousness of one's duties
दडपली सारी आधुनिकतेच्या आवरणात
in name of modernity we have bundled away आपल्याच चारित्र्याची सखोल संस्कृती
the entire culture of our morality
वरकरणी जरी दाखवत असू पुरोगामी
even if we display our sophistication outwardly
दिसुन येई नेहमीच प्रसंगी अधोगती
when the occassion comes, seen is one's regress
कशास जगलो, का जगलो कोणी बरे सांगावे
for what did we live, why did we live, who will tell us
उठता बसता मात्र दोष नशिबाला द्यावे
time and again (literal: sitting & standing) cursing (putting responsibility on) one's fate तुडविली सारी बंधने आज माणसाने
broken all ties today has man
म्हणून का फिरविली पाठ निसर्गाने?
is that why nature has turned its back on us?