Wednesday, July 1, 2009

निरंकुश माणूस

निरंकुश माणूस
भौतिक सुखाच्या ह्या गराड्यात
हरवलय माणसाच माणूसपण
धरुनिया सुखाची अतृप्त लालसा
बांधलय वेठीला स्वतःच स्वपण
असू जरी आम्ही हक्कासाठी अधाशी
नसे मात्र सोयरसुतकही कर्तव्याशी
दडपली सारी आधुनिकतेच्या आवरणात
आपल्याच चारित्र्याची सखोल संस्कृती
वरकरणी जरी दाखवत असू पुरोगामी
दिसुन येई नेहमीच प्रसंगी अधोगती
कशास जगलो, का जगलो कोणी बरे सांगावे
उठता बसता मात्र दोष नशिबाला द्यावे
तुडविली सारी बंधने आज माणसाने
म्हणून का फिरविली पाठ निसर्गाने?

Translation

निरंकुश माणूस
The Unbridled man
भौतिक सुखाच्या ह्या गराड्यात
In this great heap of worldly joys,
हरवलय माणसाच माणूसपण
man's humanity is lost
धरुनिया सुखाची अतृप्त लालसा
having the ever unquenched greed of these joys
बांधलय वेठीला स्वतःच स्वपण
one has even bet one's self-esteem
असू जरी आम्ही हक्कासाठी अधाशी
if we are greedy for our rights
नसे मात्र सोयरसुतकही कर्तव्याशी
but there is no consciousness of one's duties
दडपली सारी आधुनिकतेच्या आवरणात
in name of modernity we have bundled away आपल्याच चारित्र्याची सखोल संस्कृती
the entire culture of our morality
वरकरणी जरी दाखवत असू पुरोगामी
even if we display our sophistication outwardly
दिसुन येई नेहमीच प्रसंगी अधोगती
when the occassion comes, seen is one's regress
कशास जगलो, का जगलो कोणी बरे सांगावे
for what did we live, why did we live, who will tell us
उठता बसता मात्र दोष नशिबाला द्यावे
time and again (literal: sitting & standing) cursing (putting responsibility on) one's fate तुडविली सारी बंधने आज माणसाने
broken all ties today has man
म्हणून का फिरविली पाठ निसर्गाने?
is that why nature has turned its back on us?

No comments:

Post a Comment